दूध साखर महाविद्यालयाचा पालकरवाडी येथे श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा  कळावी आणि गावकऱ्यांचे  प्रबोधनाचे व्हावे म्हणून सात दिवसाची निवासी शिबिर पालकरवाडी येथे संपन्न झाले  मंगळवार दिनांक 16 1 2024. रोजी  सकाळी दहा वाजता गावातून प्रबोधन फेरी आणि गाव स्वच्छतेचा प्रारंभ करून जागृती करण्यात आली. तर संध्याकाळी पाच वाजता श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि दूध साखर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय के पी पाटीलसो यांच्या हस्ते, माननीय महेशराव नामदेवराव भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि कारखान्याचे संचालक माननीय उमेशराव भोईटे, गावातील उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य यांच्य उपस्थितीत श्रम शिबिराचे उद्घाटन  संपन्न झाला. त्यानंतर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ए.पी.आय अमित गोते, यांनी मी कसा घडलो, दि.17 रोजी पाच वाजता मुख्याध्यापिका सौ. सविता पाटील, यांचे मुलांची पालकांच्या विषयीची भूमिका या विषयावर व्याख्यान, दि. 18 रोजी पाच वाजता मा. कृष्णात साठे यांचे रक्तदान,नेत्रदान, अवयव दान या विषयावर व्याख्यान, शुक्रवार दिनांक 19 सकाळी 11 वाजता डॉ. गीता हलकर्णीकर यांचे स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या व उपाय या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी पालकरवाडी गावच्या उपसरपंच सौ दिपाली पालकर होत्या. तर दुपारी तीन ते सहा या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रम या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. क्रांती उर्फ अरुंधती संदीप पाटील तर सौ रंजना आप्पासो पाटील प्रमुख उपस्थितीमध्ये तर गावातील सर्व महिला यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पाककला, रांगोळी, संगीत खुर्ची, डोक्यावरून घागर वाहून नेणे, इत्यादी स्पर्धां घेण्यात आल्या. शनिवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. उमाजी कुंभार यांचे कॅन्सर बाबत घ्यावयाची काळजी या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले,रविवार दि. 21 रोजी सायंकाळी सहा वाजता सौ प्रिया अमोद यांचे आजच्या तरुणाईची वाटचाल या विषयावरील व्याख्यान झाले. रात्री आठ वाजता एन.एस.एस. मधील स्वयंसेवकांनी ग्रामस्थांच्या पुढे विविध गुणदर्शनच्या कार्यक्रम सादर केला. दि. 22 रोजी शिबिराचा समारोप समारंभ श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक, हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीचे नूतन अध्यक्ष उमेशराव नामदेवराव भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली, मा. डी.एस.पाटील, मा. राजेंद्र मोरे आणि मा.रणजीत मुडुकशिवाले दूधसाखर महाविद्यालय विकास समिती सदस्य, प्राचार्य डॉ संजय पाटील,सरपंच,उपसरपंच, सदस्य गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना शिस्त लागावी म्हणून सकाळी 6 वाजत योगासने प्राणायाम मेडिटेशन ,8 ते 12 श्रमदान, दुपारी सर्वेक्षण आणि गट चर्चा सायंकाळीं व्याख्याने इ. कार्यक्रम या कालावधीत करण्यात आले.

  N.S.S.कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. लक्ष्मण करपे आणि N.S.S.कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. सी वाय जाधव, डॉ. एस.बी.देसाई, डॉ.एस.एच.पाटील, योगशिक्षक डॉ. एस.. गंगावणे, डॉ. आर आर पोवार, प्रा.एस. व्ही. सुतार,प्रा..एस. कांबळे, प्रा सौ.सुहानी पाटील, प्रा. सौ.वैशाली कांबळे, प्रा. सौ .संपदा वारके, प्राध्यापिका सौ. अंगज मॅडम, संजय गुरव, बाबासाहेब पवार,सिद्धार्थ पाटील, संग्राम भोईटे, विजय तळेकर आणि स्वयंसेवक सेविका गावातील ग्रामस्थ, दूधसाखर महाविद्यालय बिद्री., पालकरवाडी गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व पंचायत समितीचे सदस्य, ग्रामसेवक गावातील विविध सहकारी संस्थांचे चेअरमन डेअरीचे चेअरमन इत्यादींच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.

Comments