दूध साखर महाविद्यालयाचा पालकरवाडी येथे श्रमसंस्कार शिबिर संपन्न . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा कळावी आणि गावकऱ्यांचे प्रबोधनाचे व्हावे म्हणून सात दिवसाची निवासी शिबिर पालकरवाडी येथे संपन्न झाले मंगळवार दिनांक 16 1 2024 . रोजी सकाळी दहा वाजता गावातून प्रबोधन फेरी आणि गाव स्वच्छतेचा प्रारंभ करून जागृती करण्यात आली . तर संध्याकाळी पाच वाजता श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि दूध साखर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय के पी पाटीलसो यांच्या हस्ते , माननीय महेशराव नामदेवराव भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि कारखान्याचे संचालक माननीय उमेशराव भोईटे , गावातील उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य यांच्य उपस्थितीत श्रम शिबिराचे उद्घाटन संपन्न झाला . त्यानंतर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ए . पी . आय अमित गोते , यांनी मी कसा घडलो , दि . 17 रोजी पाच वाजता मुख्याध्यापिका सौ . सविता पाटील , यांचे मुलांची पालकांच्या विषयीची भूमिका या विषयावर व्याख्यान , दि . 18 रोजी पाच वाजता मा . कृष्णात साठे यांचे रक्तदान , नेत्रदान , अ